Posts

Showing posts from May, 2019

पुरोगामी मी, प्रतिगामी मी

Image
पुरोगामी मी, प्रतिगामी मी                 टीव्ही, वर्तमानपत्रांत अनेक वेळा पुरोगामी आणि प्रतिगामी हे शब्द ऐकलेले आहेत. मी सामान्य माणूस असल्याने मी पुरोगामी आणि प्रतिगामी या दोन शब्दांतील कोणत्या कोष्टकात बसतो हे जाणून घ्यायचा सातत्याने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केला. अनेक वर्षांच्या वैचारिक वादळानंतर जेव्हा शांतता पसरली आणि धुराळा बसला तेव्हा लक्षात आलं. मी यातला कोणीही नाही. कारण मी एक सामान्य माणूस आहे.                 या कोष्टकांमध्ये घालून सामान्य माणसाला भरडण्याचा प्रयत्न वर्षानु वर्षे झाला. इन फॅक्ट, जर तुम्हाला विचारवंत, बुद्धीवादी इत्यादी म्हणवून घ्यायचे असेल तर तुम्हाला 'पुरोगामी' या कोष्टकात बसणे भाग होते. वास्तविक सुरुवातीला मला या शब्दांचा अर्थच कळला नव्हता. सर्वधर्मसमभाव या शब्दाचे हे दोन्ही शब्द चुलत भाऊ असावेत, असा माझा समाज होता. पुढे थोडंफार वाचन केल्यावर त्यांचा अर्थ काळाला (असं मला वाटतं). तर पुरोगामी म्हणजे सुधारित विचारांचा आणि प्रतिगामी म्हणजे जुनाट, बुरसटलेल...

साध्वी प्रज्ञा यांचं वक्तव्य

Image
साध्वी प्रज्ञा यांचं वक्तव्य             साध्वी प्रज्ञा प्रचंड बहुमताने निवडून आल्या. काही महिन्यांपूर्वीच ज्या राज्यात भाजपचा पराभव झालेला त्याच राज्यातुन त्या निवडून आल्या हे विशेष. त्यांच्याबद्दल बरेच बुद्धिवादी बरंच काही बोलत आहेत. त्यांनी हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेली वक्तव्ये किती हिणकस आहेत, असा साधारण या बुद्धिवाद्यांचा सूर आहे. याबाबत मला काही प्रश्न पडले त्यांची उत्तरे मिळेनात म्हणून हा लिहिण्याचा प्रपंच...             साध्वी प्रज्ञा यांच्यावर २००८ मधील मालेगाव बॉम्ब हल्ल्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप ठेवला गेलेला. त्याच प्रमाणे त्यांच्यावर समझोता एक्सप्रेस बॉम्ब धमक्यांशी संबंध असल्याचाही आरोप होता. या दोन मोठ्या आतंकवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा आरोप ठेवून त्यांना पोलीस कस्टडीत ठेवण्यात आलेलं. तद्दन नऊ वर्षे! मोक्का कायद्याच्या आधारे. अशा प्रकारच्या एकाच प्रकरणात आरोपी असल्यास मोक्का लावता येत नाही. पण दोन असल्यास मोक्का लागतो, हे इथे नमूद करायलाच हवे. मोक्का लागलेल्या आरोपी...