Posts

Showing posts from September, 2018

यो यो मूषकसिंग

Image
यो यो मूषकसिंग बाप्पाचा होता वाढदिवस उत्सव आता दहा दिवस लाडू मोदकांवर मारू हात मी बाप्पाचा उजवा हात यो यो मूषकसिंग...... इलेक्ट्रिक गिटारच्या कर्णकर्कश ढणढणाटाने बाप्पा दचकले. दिवसभर वाजणाऱ्या डीजेच्या आवाजाने त्यांचे कान विटलेले. डोक्यात अजूनही घणाचे घाव बसत होते. पण उंदीरमामांना नवीनच प्रकार सुचलेला. त्याच बंद पडलेल्या डीजेला माईक आणि इलेक्ट्रिक गिटार जोडून त्यांनी रॉक म्यूझिक नावाचा उच्छाद मांडलेला. बाप्पा वैतागले. "ही काय अवदसा सुचली याला आता...', त्यांच्या डोक्यात अजून एका विचाराने घणाचा गाव घातला. क्षणार्धात डीजे बंद पडला आणि समोर विचित्र कपडे आणि गॉगल लावून आणि हातातल्या इलेक्ट्रिक गिटार नामक अद्ययावर तुणतुण्याच्या तारांशी कुस्ती खेळणाऱ्या उंदीरमामांवर बाप्पाची नजर खिळली. स्पीकर्स बंद झाले तरी मामांची तंद्री तुटली नव्हती. "हे काय चालवलं आहेस तू?', बाप्पांनी मामांची तपश्चर्या भंग केली. "बाप्पा...आय ऍम यो यो मूषकसिंग नाऊ', मामांनी बाप्पासमोर फुशारकी मारली. "मूर्खा, डोकं भिणभिणलंय माझं त्या आवाजांनी आणि तू अजून आवाज करतो आहेत......