पुरोगामी मी, प्रतिगामी मी
पुरोगामी मी, प्रतिगामी मी टीव्ही, वर्तमानपत्रांत अनेक वेळा पुरोगामी आणि प्रतिगामी हे शब्द ऐकलेले आहेत. मी सामान्य माणूस असल्याने मी पुरोगामी आणि प्रतिगामी या दोन शब्दांतील कोणत्या कोष्टकात बसतो हे जाणून घ्यायचा सातत्याने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केला. अनेक वर्षांच्या वैचारिक वादळानंतर जेव्हा शांतता पसरली आणि धुराळा बसला तेव्हा लक्षात आलं. मी यातला कोणीही नाही. कारण मी एक सामान्य माणूस आहे. या कोष्टकांमध्ये घालून सामान्य माणसाला भरडण्याचा प्रयत्न वर्षानु वर्षे झाला. इन फॅक्ट, जर तुम्हाला विचारवंत, बुद्धीवादी इत्यादी म्हणवून घ्यायचे असेल तर तुम्हाला 'पुरोगामी' या कोष्टकात बसणे भाग होते. वास्तविक सुरुवातीला मला या शब्दांचा अर्थच कळला नव्हता. सर्वधर्मसमभाव या शब्दाचे हे दोन्ही शब्द चुलत भाऊ असावेत, असा माझा समाज होता. पुढे थोडंफार वाचन केल्यावर त्यांचा अर्थ काळाला (असं मला वाटतं). तर पुरोगामी म्हणजे सुधारित विचारांचा आणि प्रतिगामी म्हणजे जुनाट, बुरसटलेल...