यो यो मूषकसिंग
बाप्पाचा होता वाढदिवस
उत्सव आता दहा दिवस
लाडू मोदकांवर मारू हात
मी बाप्पाचा उजवा हात
यो यो मूषकसिंग......
उत्सव आता दहा दिवस
लाडू मोदकांवर मारू हात
मी बाप्पाचा उजवा हात
यो यो मूषकसिंग......
इलेक्ट्रिक गिटारच्या कर्णकर्कश ढणढणाटाने बाप्पा दचकले. दिवसभर वाजणाऱ्या डीजेच्या आवाजाने त्यांचे कान विटलेले. डोक्यात अजूनही घणाचे घाव बसत होते. पण उंदीरमामांना नवीनच प्रकार सुचलेला. त्याच बंद पडलेल्या डीजेला माईक आणि इलेक्ट्रिक गिटार जोडून त्यांनी रॉक म्यूझिक नावाचा उच्छाद मांडलेला.
बाप्पा वैतागले. "ही काय अवदसा सुचली याला आता...', त्यांच्या डोक्यात अजून एका विचाराने घणाचा गाव घातला. क्षणार्धात डीजे बंद पडला आणि समोर विचित्र कपडे आणि गॉगल लावून आणि हातातल्या इलेक्ट्रिक गिटार नामक अद्ययावर तुणतुण्याच्या तारांशी कुस्ती खेळणाऱ्या उंदीरमामांवर बाप्पाची नजर खिळली. स्पीकर्स बंद झाले तरी मामांची तंद्री तुटली नव्हती. "हे काय चालवलं आहेस तू?', बाप्पांनी मामांची तपश्चर्या भंग केली. "बाप्पा...आय ऍम यो यो मूषकसिंग नाऊ', मामांनी बाप्पासमोर फुशारकी मारली. "मूर्खा, डोकं भिणभिणलंय माझं त्या आवाजांनी आणि तू अजून आवाज करतो आहेत... हे काय कपडे घातले आहेस आणि काय बरळतो आहेस? यो यो काय, उंदीरसिंग काय?' बाप्पांच्या रागात भर पडत चाललेली. "बाप्पा तुम्ही माझी तपस्या भंग केलीत...मी तुमचा एवढा खास, पण मी तुमचं नाव आळवलं तर तुम्हाला त्रास झाला. दिवसभर ही माणसं असंच किंवा यापेक्षाही चित्रविचित्र काहीबाही करत असतात. तेव्हा त्यांचे डीजे तुम्ही बंद नाही करत. माझा डीजे मात्र तुम्ही बंद केलात. मी नाही बोलणार तुमच्याशी जा!', मामांचं ते रुसुबाई रूप आणि फुगलेले गाल पाहून बाप्पाचा राग कुठल्या कुठे पळालेला. ते खुदकन हसले. रिद्धीसिद्धीही अशा त्यांच्यावर रुसत नसत. पण मामांची गोष्टच वेगळी होती. त्याशिवाय अधुनमधून मामा असे प्रकार करून बाप्पांची करमणुक करीत. पार्वतीमातेने बाप्पांच्या डाएटचा चार्ट मामांकडेच दिलेला असल्यामुळे बाप्पांचे मोदक आणि लाडू खायचे प्रमाणही मामांच्या हातात होतं. त्यामुळे त्यांना सर्व माफ होतं.
"मूषका... अरे तुझ्यात आणि या माणसांत फरक आहे. त्यांना ते काय करत आहेत हे कळत नाही. वेड्या श्रद्धेने हे सर्व करत असतात. त्यामुळे दुसऱ्यांना किती त्रास होत असेल, याची यांना कल्पनाही नसेल. पण तू माझं वाहन... तू पायाशी असल्याशिवाय माझी पूजा होत नाही. तुला तरी कळायला हवं, आपण करतो त्या आवाजाने लोकांना किती त्रास होत असेल?' बाप्पांनी मामांना समजावायचा प्रयत्न केला.
"पण बाप्पा, इथे तर तुमच्या नावाने बाजार मांडलाय या लोकांनी. हे काय भक्त म्हणायचे? तुमच्या अवाढव्य मूर्ती बनवतात. त्यांची पूजाही होत नाही. विसर्जन करताना त्या तोडाव्या लागतात. देवाला प्रसन्न करायला काय मोठाले मंडप आणि प्रचंड मूर्ती बनवाव्या लागतात? जेवढी मोठी मूर्ती तेवढा तो गणपती पावतो, अशी परंपरा रूढ केली आहे. त्या नावावर करोडो रुपयांच्या देणग्या गोळा होतात. बरं श्रध्देने त्याच देवाचं दर्शन करायला आलेल्या भाविकांना कशी धक्काबुक्की होते हे तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहताच. एवढंच नाही, व्हीआयपींना दुसरी एंट्री असते. हे व्हीआयपी हे काय बाकीच्या भाविकांपेक्षा वेगळे असतात तुमच्यासाठी बाप्पा? बरं मंडपात जागरण करण्याच्या नावाखाली जुगाराचे अड्डे लागतात ते वेगळे. त्याला कोण थांबवणार? डीजेचा तमाशा तर विचारूच नका. त्यावर गाणी कोणती लावायची याचं तर ताळतंत्रच उरलेलं नाही. शीला की जवानी, बेबी डोल, चिकनी चमेली, यो यो हनीसिंग या सगळ्यांशी माझी तोंडओळख या डीजेंनीच घडवली. मला वाटलं तुम्हाला हे सगळं आवडतं. म्हणून मीही यो यो मूषकसिंग बनायचा प्रयत्न करतोय.' मामा बोलत होते आणि बाप्पा ऐकत होते. त्यांच्या सोंडेमागून खोडकर स्मित डोकावत होतं.
बाप्पा गडगडून हसले. "मूषका...याला म्हणतात अर्थकारण. या मोठमोठ्या मूर्तीं बनवल्याने मूर्तीकारांना चांगले दिवस आले. मंडपवाल्यांची चंगळ झाली. डीजेवाले उदंड झाले. किती लोकांना रोजगार मिळाला. पण हे सगळं अर्थकारणासाठी. मी तिथेच असतो जिथे श्रध्दा असते. मोठी मूर्ती बनवली म्हणून माझं वास्तव्य तिथे जास्त नसतं, तर भाविकंची ही श्रध्दा असते की मी तिथे आहे. ते लाखोंच्या संख्येने गाऱ्हाणी घेऊन अशा ठिकाणी येतात.......आता तुला मी यातली खरी मजा सांगतो. सांग पाहू मला कसली देवता म्हणतात?' मामांनी क्षणभर विचार केला, "बुध्दीची, ज्ञानाची, विघ्नहर्ता तुम्ही.'
"अगदी बरोबर. मग हे लोक मी दिलेली बुध्दी वापरून का नाही विचार करत, की देवाचं पेटंट कोणत्या एका ठिकाणी नाही. मी अनादि, अनंत, सर्वव्यापी आहे. मग माझ्यासमोर गाऱ्हाणी मांडायला त्या ठिकाणीच का जातात, जिथे मोठाल्या मूर्ती ठेवल्या आहेत? नवस बोलायचा तो देवाला. त्याच्या कुठल्यातरी मूर्तीला नाही, एवढाही जर मनुष्यप्राणी स्वत:च्या बुध्दीचा वापर करत नसेल, तर त्याला मी काय करू शकतो? देवाची मूर्ती मोठी बनवली तर तिथे देवाचं वास्तव्य जास्त, असा जर कोणाचा समज असेल, तर त्यांच्या बुध्दीमत्तेची मला कीव येते. ही माणसं जर अशा ठिकाणी जायची आणि देणग्या देण्याचं बंद झाली, तर हा माझ्या नावाने सुरू केलेला बाजारही बंद होईल..... माणसाला त्याच्या कर्माचंच फळ मिळत असतं. कर्म चांगलं असेल तर चांगलं, वाईट किंवा चूक असेल तर त्याप्रमाणे..... आता मला संाग मूषका, जर सर्वांना माहीत आहे की काही ठिकाणी भाविकांना वाईट वागणूक दिली जाते, तर त्या ठिकाणी तासन तास रांगेत उभे राहून त्या ठिकाणचं महत्त्व का वाढवतात? हे कर्म त्यांचंच आणि त्यांनीच त्याचं फळ भोगायचं. मला मनोभावे कुठेही केलेला नमस्कार भावतो. मग मी त्यांना काय बरोबर काय चूक हे चमचाने भरवायला का जावू? बुध्दी दिलीय ना मी? ती वापरावी आणि बरोबर काय, चूक काय हे ठरवावं.', उंदीरमामा अंतर्मुख होऊन बाप्पांचं बोलणं ऐकत होते.
उंदीरमामांना अजूनही बाप्पांचं म्हणणं पूर्णपणे पटलेलं दिसत नव्हतं. बाप्पा पुढेे म्हणाले, "टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, तो लोकांना संघटीत करण्यासाठी. कारण भारतीय संघटीत नव्हते आणि ते संघटीत झाल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणं शक्य नव्हतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र सार्वजनिक गणेशोत्सवांनी हळु हळू विभत्स स्वरूप ध्यायला सुरुवात केली. वर्गण्यांसाठी धमकावणं, रस्त्यावर मंडप बांधून गणेशोत्सव साजरा करणं. त्यासाठी लाखोंची रोषणाई, सजावट, डीजे, टोलेजंग मूर्ती हा सगळा कारभार सुरू झाला. निव्वळ आपला गणेशोत्सव जास्त नावाजलेला व्हावा यासाठी.... आणि एकदा का भाविकांची गर्दी वाढू लागली, की देणग्याही वाढतात, नाव वाढतं. अजून लोक येतात. ही सगळी पब्लिसिटी रीतसर केली जाते आणि सामान्य जनता याला बळी पडते. सुरुवातीला रोषणाई पहायला, सजावट पहायला, भव्य मूर्ती पहायला आकर्षण म्हणून येणारे लोकच, "तिथला देव नवसाला पावतो' अशी अफवा पसरवतात आणि दिवसेंदिवस जास्त गर्दी अशा ठिकाणी खेचली जाते.'
उंदीरमामांना आता बाप्पा काय म्हणताहेत ते कळलं आणि पटलंही. त्यांनी डोळ्यांवरचा गॉगल काढून फेकून दिला. हातातलं गिटार दूर भिरकावलं. हात जोडले आणि म्हणाले "बाप्पा! यांना सुबुध्दी द्या...' मामा चेहेरा वर करताच त्यांना बाप्पा चॉकलेट मोदक मटकावताना दिसले. उंदीरमामा घाबरले, "देवा, तुमचा दिवसाचा कोटा संपलाय केव्हाच. अजून नका मोदक खाऊ, नाहीतर पार्वतीमाता माझ्या पाठीचं धिरडं करेल.' बाप्पा डोळे वटारून बोलले, "म्हणजे तू मातेसमोर तोंड उघडणार तर.....' उंदीरमामा निरुत्तर झालेले. त्यांच्यासाठी आता इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होती......

Comments
Post a Comment